स्व नितीन महाविद्यालयाची बहि:शाला व्याख्यानमाला संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 28 स्वा. रा.ति.म. विद्यापीठ, नांदेड व स्व. नितीन महाविद्यालय पाथरी यांच्या वतीने कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा पाथरी येथे दिनांक 28/ 01/ 2025 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता बहि:शाल व्याख्यानमाला संपन्न झाली.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. रमेश शिंदे राजर्षि शाहू महाविद्यालय परभणी यांनी ‘राष्ट्र उभारणीत युवकाची भूमिका’या विषयावर बोलताना युवक हे देशाचे आभार स्तंभ आहेत या युवकांचे मन मनगट आणि मस्तीष्क सुदृढ करण्यासाठी प्रबोधन पर कार्यक्रमाची नितांत गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भविष्यात व्याख्यानमालाचे समन्वय डॉ. मोरे जी. जे. यांनी केले व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री होगे हे अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.सामले एस. टी. हे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहशिक्षक नाथभजन यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.