वडदम आविका निवडणुकीत आकुला मल्लिकार्जुनराव विजयी
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
सात जागांपैकी पाच जागांवर आविस समर्पित उमेदवार विजयी.
सिरोंचा तालुक्यातील वडदम येथील आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्थेची तीन जागांसाठी सोमवारी वडदम येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्तीतीत घेण्यात आली.सदर निवडणूक शांततेत पार पडली.या निवडणुकीत वडदम, पोचमपल्ली,चिंतारेऊला,नडीकुडा, रंगधामपेठा येथील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावले.
यात बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,गुंडाबोईंना श्रीनिवास राजांना,गुंडाबोईंना नागराणी हे निवडून आले.तर ललिता शंकर सल्ला व समय्या सिंगणेंनी हे अविरोध निवडून आल्याने आविस समर्पित विजयी उमेदवारांची संख्या पाचवर पोहोचली आहे.यावेळी सर्व विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले.
विजयी उमेदवारांनी सदर निवडणूक आविसचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम, जि.प.चे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात तर सहकार नेते व को.ऑफ.रेटिव्ह बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आली. तर विरोधी पॅनलचे नेतृत्व बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवर यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आले होते. यात विरोधी पॅनलचे उमेदवारांची पराभव झाल्याने विजयी उमेदवारांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केले.
विजयी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सहकार नेते व जिल्हा कॉ ऑफ रेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार,आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,आविस सल्लागार रवी सल्लम,आविस शहर अध्यक्ष रवी सुल्तान,पोचमपल्ली ग्राम पंचायत उपसरपंच ललिता शंकर सल्ला,चिंतारेऊला ग्राम पंचायत सरपंच तिरुपती जोडे,आविका उपाध्यक्ष राजांनां गुंडाबोईंना,कोठारी धर्मय्या,दुर्गय्या कोठारी,मेचीनेनी चंदू,वासू सपाट,सारली मधुकरदुर्गम,नारायण मूडमडीगेला,मल्लेश बट्टी,अडपा राजेंद्र,जेट्टी सुधाकर,सल्ला रमेश,सल्ला रवी,शंकर वेंकांना सल्ला,कोत्तापल्ली रवी,कुम्मरी सुधाकर,नंदू मोरला,सोन्नरी बाजारू,मधुकर असरेली,तिरुपती जनगम,जनार्धन जनगम,मोडेम समय्या,जोडे श्रीशैलम,तिरुपती कटला,तिरुपती दीनाबोईंना,राकेश येलाकुर्ती,चौधरी श्रीनिवास,अजय बीनाबोईंना आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.