भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शहरातील अक्षय कम्प्युटर च्या वतीने करण्यात आले होते . या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी स्पर्धकांना विविध स्वरूपांच्या बक्षिसाचे वितरण एका कार्यक्रमात करण्यात आले .
शहरातील अक्षय कॉम्प्युटर्स सेंटर येथे नुकतीच ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होते. स्पर्धेत शालेय गट व एक खुल्ला गट ज्यात दहावीच्या पुढील व वय वर्ष ६० पर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

शनिवार २३ मार्च रोजी तालुक्यातील बोरगव्हाण येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये एका कार्यक्रमांमध्ये विजेत्यांना बक्षीस आमचे वितरण करण्यात आले .
शालेय गटात सहभागी ४५० विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेल्या क्षितिज नागनाथ कदम या विद्यार्थ्याला प्रथम बक्षीस सायकल देण्यात आली. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या अथर्व बाबासाहेब वराडे ,अथर्व तुकाराम पौळ,कुणाल विनायक इंगळे ,पूनम भारतराव इंगळे यांना पारितोषिक वितरण करण्यात आले .
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ,शिवकन्या तुकाराम पौळ,मुख्याध्यापक बजरंग गिल्डा, शिक्षक,शिक्षिका व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .