ताज्या घडामोडी

युवकास गाय दान देत गोवंश संवर्धन अभियानाचा इसाद येथुन प्रारंभ

संत मोतीराम महाराज गोशाळेचा उपक्रम

जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी

गाय संभाळण्याची आवड असलेल्या एका युवकास गाय दान देत गोवंश संवर्धन अभियानाचा ईसाद येथून शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगावच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत गाय दान देण्यात आली.

शिवस्मारक ईसाद या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता नियमितपणे दर शुक्रवारी होणाऱ्या शिववंदना कार्यक्रमात गोदान कार्यक्रम पार पडला. गावातील युवक श्रवण पांचाळ यास संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव यांच्या वतीने गाय सांभाळण्यासाठी दान देण्यात आली. शेतकऱ्यांनी गायी सांभाळणे अवघड झाल्याने आपल्या गायी कत्तलखान्याकडे न विकता गोशाळेकडे द्याव्यात. गोशाळेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात गरजू व गाई वर प्रेम असणाऱ्या शेतकऱ्यांना गाय विनामूल्य दान म्हणून देण्यात येणार आहेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी ह भ प निवृत्ती महाराज ईसादकर, ह भ प रोहिदास महाराज मस्के, हभप प्रभाकर महाराज बचाटे, ह भ प आकाश महाराज खोकले, भोलारामजी कांकरिया सेवा ट्रस्ट अध्यक्ष मंजुषा ताई दर्डा ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिवसेना नेते सुभाषराव देशमुख, संत मोतीराम महाराज गोशाळा गोपिचंदगड पडेगाव चे संचालक, तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर निवृत्तीराव भेंडेकर, प्रमोद उटेकर, जयवंत कुंडगीर, बाळासाहेब टेकाळे, मुंजाभाऊ लांडे, पूजा दर्डा, सौ पेकम लक्ष्मण देवकते, जयराम देशमुख, रामेश्वर बचाटे ,केशव नागरगोजे, निवृत्ती बडे, भगवानआबा भोसले, हरिभाऊ महाराज आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर सातपुते, यश भोसले, नरेंद्र भालेराव , श्रावण पांचाळ राजेश भोसले, विजय भोसले ,राहुल भोसले, रामा नेजे ,प्रभाकर मोक्कपल्ले, रोहित कानडे, वैभव भोसले, सतीश बरवे ,गोविंद भोसले गणपत भोसले ,जगन्नाथ भोसले, दिगंबर सातपुते, कल्याण भोसले, यांच्यासह गावातील युवकांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close