भुसंपादीत जमीनीच्या मोबदल्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव गोठे करतेय तब्बल 15 वर्षांपासून प्रतिक्षा
वंदे मातरम् चांदा कडेही केली तक्रार दाखल !
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर तालुक्यातील मौजा वांढरी येरुर या गांवची शेत जमीन महाराष्ट्र शासनाने गेल्या पंधरा सोळा वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामासाठी भुसंपादीत केली.परंतु या जमीनीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही.या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे गट)चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभाचे अध्यक्ष पुंडलिक गोठे व अन्य एकविस शेतकऱ्यांनी वारंवार वरिष्ठांकडे निवेदने व तक्रारी दिल्या आहेत परंतु त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही.या संदर्भात त्यांनी नव्याने सुरू झालेल्या वंदे मातरम् चांदा तक्रार निवारण प्रणालीकडे उद्घाटनाच्या दिवशीच उपरोक्त मोबदला मिळण्यासाठी तक्रार दाखल केली होती. आज वंदे मातरम् सुरु होवून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे.तरी सुध्दा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.कुंभे नावाचे एक वरिष्ठ अधिकारी निधी उपलब्ध नाही तर आम्ही काय करु अश्या पध्दतीचे उत्तर देत आहे.मग हा निधी उपलब्ध करून घेणे हे कोणाचे काम असा सवाल देखिल पुंडलिकराव गोठे यांनी आज उपस्थित केला आहे. दरम्यान मौजा साखरवाही येरुर वांढरी (एम.आय.डी.सी.)दाताळा रस्ता संदर्भात शेतकऱ्यांना तातडीने मोबदला मिळावा यासाठी गोठे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांचेकडे तक्रार सादर केली आहे .या तक्रारीची एक प्रत चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना ही पाठविण्यात आली असल्याचे गोठे यांनी आज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.