ताज्या घडामोडी

सोनपेठ तालुक्यातील डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

पाथरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ.सुरेशराव वरपुडकर साहेब

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या प्रयत्नाने सोनपेठ तालुक्यातील अनेक डांबरीकरण रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व सार्वजनिक बांधकाम या विभागांतर्गत राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला होता.

आज सोनपेठ तालुक्यातील या डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष सावंत, अ‍ॅड.हनुमंत जाधव पोहंडुळकर, डॉ.मुंजाभाऊ धोंडगे, पप्पू मोकाशे, जगन्नाथ कोलते, अमोल बचाटे, सुदर्शन कदम, बाळासाहेब हरगुडे, प्रकाश बचाटे, राजाभाऊ सावंत, पंडितराव सावंत, राजाभाऊ मुंढे, शेख तय्यब, राजू सौदागर उपस्थित होते.

पाथरी विधानसभा मतदार संघातील अनेक डांबरीकरण रस्त्यांना आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या प्रयत्नाने राज्य सरकार कडून निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील वंदन डांबरीकरण रस्त्यासाठी 1 कोटी 29 लक्ष रुपये, बुक्तरवाडी डांबरीकरण रस्त्यासाठी 82 लक्ष रुपये, पारधवाडी रस्त्यासाठी 1 कोटी 8 लक्ष रुपये, नैकोटा रस्त्यासाठी 3 कोटी 74 लक्ष रुपये, चुकार पिंपरी डांबरीकरण रस्त्यासाठी 77 लक्ष रुपये, गवळी पिंपरी रस्त्यासाठी 70 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच आज परभणी तालुक्यातील तरोडा येथील डांबरीकरण रस्त्यांचे देखील भूमिपूजन आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघातील चारही तालुक्यातील अनेक रस्त्यांना यावेळी निधी प्राप्त झाला असून उर्वरित रस्त्यांना पुढील काळात निधी प्राप्त होऊन त्या रस्त्यांचे कामेही मार्गी लावण्यात येतील. तसेच रस्त्यांव्यतिरिक्त इतर विकास कामासाठी देखील निधी कमी पडू देणार नसल्याचे व पाथरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आ.सुरेशराव वरपुडकर यांनी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close