आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील तळोधी (नाईक) येथे आदिवासी गोवारी समाज सभागृहाचे लोकार्पण संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दि. २३ जानेवारी ला आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील तळोधी (नाईक) येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपये किमतीच्या आदिवासी गोवारी समाज सभागृहाचे लोकार्पण संपन्न झाले. सदर लोकार्पण सोहळ्यात आदिवासी गोवारी समाज तळोधी (नाईक) च्या वतीने भव्य सभागृह उभारून दिल्याबद्दल आ. बंटीभाऊ भांगडीया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आदिवासी गोवारी समनव्य समिती महाराष्ट्र अध्यक्ष शालीकभाऊ नेवारे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, तालुका उपाध्यक्ष मनीष तुम्पल्लीवार, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी संचालक ओमप्रकाश गणोरकर, सरपंच संजय येसांबरे, माजी सरपंच कलीम शेख, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाकडे, उपसरपंच प्रकाश धानोरकर, ढेलू राऊत गडचिरोली, विलास काळसरपे गोविंदपूर, नामदेव नन्नावरे, मच्छीमार सोसायटी चंद्रपूरचे संचालक रमेश भोयर, प्रवीण गणोरकर, शोभाताई दहिकर, वन समिती तळोधी अध्यक्ष किशोर येसांबरे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गुणवंत दहिकर, पोलीस पाटील रामप्रभु नागदेवते, रेखाताई नागदेवते, सरपंच ग्रा.पं. सातारा गजानन गुडधे, डांगे गुरुजी, नथू श्रीरामे, मनोहर रणदिवे, महेंद्र बारसागडे, वनरक्षक बलकी, ग्रामसेवक चौधरी, माजी सरपंच पार्वताताई किन्नाके, भाऊराव कावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी गोवारी समाज समिती तळोधी (नाईक) चे अध्यक्ष हरीशचंद्र नेवारे, उपाध्यक्ष रतनलाल नागोसे, सचिव प्रदीप काळसरपे, कोषाध्यक्ष ताराचंद शेंन्द्रे तसेच, उपस्थित सर्व समाज बांधवांनी लोकार्पण सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.