रमजान या पवित्र महिन्यात सतत वीज चालू ठेवण्यात यावी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील ग्रामीण मौजे हादगाव बु. पोहे टाकळी रेनाखळी बाबळगाव विटा लिंबा वाघाळा रेणापूर वडी नाथरा जवळा झुटा कासापुरी खेरडा लोणी बु. गुंज उंबरा या ठिकाणी बहुसंख्या मुस्लिम समाज असल्यामुळे दि.12/3/2024ते13/42024 या कालावधीत रमजान या पवित्र महिन्यात विविध धार्मिक नियमाचे परिपालन केले जात असतात म्हणून बाबळगाव सर्कल ते हदगाव सर्कल या ठिकाणी उपअभियंता साहेब यांनी आज दिनांक12/3/2024. रोजी बिल न भरल्याने दिवसभरात लाईट बंद केले असल्याने मुस्लिम बांधवांना रोजा असल्याने लाईट विना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष देऊन या रमजान पवित्र महिन्यात पाथरी तालुक्यातील संपूर्ण गावा मध्ये विद्युत पुरवठा रमजान ईद निमित्तस सतत वीज पुरवठाचालू ठेवावेत असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तथा हदगाव ग्रामपंचायतचे सदस्य शेख अशफाक मुसा व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले.