कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
ग्रामवासियांनी मानले जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार .
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड तालुक्यातील पारडी-मिंडाळा – बाळापुर जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं. कोर्धा येथील नविन वस्तीतील प्रकाश चिताडे ते महेश मेश्राम यांच्या घरांपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले . या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी वस्तीतील नागरिकांनी ग्रा.पं.मार्फत जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती.
चंद्रपुर जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांनी याची दखल घेत जिल्हा निधीतून या रस्त्यासाठी १० लक्ष रुपयांची तरतुद करुन दिल्याने संजय गजपुरे यांनी सौ.संध्याताई गुरनुले यांचे आभार मानले आहे. कोर्धा येथे आतापर्यंत नवीन आंगणवाडी बांधकाम , शाळा दुरुस्ती , जि.प. शाळेसाठी विज्ञान वर्गखोली , खनिज निधीतून सिमेंट रस्ते , नवीन बंधारा , शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडी वर्क बांधकाम , यासोबतच इतर कामांच्या माध्यमातुन गावाच्या विकासासाठी संजय गजपुरे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे. ग्रामवासियांना दिलेला शब्द पुर्ण करणाऱ्या विकासाभिमुख जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचेही यावेळी ग्रामस्थांनी आभार मानले.
याप्रसंगी कोर्धा ग्राम पंचायत सरपंच सौ. पुष्पाताई चौधरी, उपसरपंच दिनेशभाऊ चौधरी, ग्रामसेवक नाकतोडे साहेब, ग्रा. पं.सदस्य हरिदासजी नवघडे, ग्रा. पं.सदस्य विलासजी चौधरी, ग्रा. पं.सदस्या सौ. रेखाताई चौधरी, ग्रा. पं.सदस्या सौ. अपर्णाताई मेश्राम, रोजगार सेवक यशवंतजी निकूरे, सामाजिक कार्यकर्ते विजयजी खोब्रागडे, युवा नेते शंकर मशाखेत्री, विनोद खेवले, रमेश पानसे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.