ताज्या घडामोडी

आजादी का अमृत महोत्सव

आनंद निकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व उन्नत भारत अभियाना अंतर्गत सहा गावात पथनाट्यातून व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महारोगी सेवा समिती, आनंदवन वरोरा व्दारा संचालीत “आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन, वरोरा”, येथील उन्नत भारत अभियान व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आनंदवन, परसोडा, सुर्ला, दादापुर, टेमुर्डा, डोंगरगांव. (रेल्वे) अशा सहा गावात पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सर्व प्रथम आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पथनाट्य सादर केले गेले.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मृणाल काळे,रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील, मराठी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक मोक्षदा मनोहर – नाईक. उपस्थित होते. या वेळी मा.प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी पथनाट्य सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
दिनांक १६ फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत आनंदवन येथील संधीनिकेतच्या प्रांगणातून पथनाट्याच्या प्रयोगाला सुरूवात झाली. आनंदवनवासीयांनी मोठ्या संख्येने या पथनाट्याला प्रतिसाद दिला. यावेळी ग्रामपंचायत आनंदवनाचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
दिनांक १७ फेब्रुवारी 2022 ला सकाळी सर्वप्रथम सुरला या गावात पथनाट्य सादर करण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत परसोडा येथे संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान तथा व्यसनमुक्तीची जनजागृती रॅली काढण्यात आली. तेथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व्यासपीठावर पथनाट्य सादर केले गेले. यावेळी ग्रामपंचायत परसोडाचे सरपंच, गावकरी व महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक हेमंत परचाके व कल्याणी आत्राम उपस्थित होते. नंतर लगेचच ग्रामपंचायत दादापुर येथे देखील संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान तथा व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पुजा फाऊंडेशन च्या पदाधिकारी यांनी सगळ्यांचे स्वागत केले. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड व साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमाची रुपरेषा उपस्थिती सर्वांना विषद केली. दादापुर गावातील प्रमुख चौकात पथनाट्य सादर करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुजा फाऊंडेशन चे अध्यक्ष अमोल नन्नावरे यांनी केले.दादापुर गावातील हा कार्यक्रम पूजा फाऊंडेशनच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पडला.
नंतर टेमुर्डा या गावातील संत तुकडोजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पथनाट्य सादर करण्यात केले. या वेळी उपस्थित महविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम बोरीकर तथा सर्व शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या पथनाट्य चा शेवटचा प्रयोग डोंगरगाव रेल्वे या गावात करण्यात आला तिथेही सुरूवातीला स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली.
डोंगरगांव (रेल्वे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यासपीठावर पथनाट्य सादर करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी व सरपंच ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते ह्या सहाही गावांमध्ये रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील,मराठी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक मोक्षदा मनोहर – नाईक, तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक उपस्थित होते. या पथनाट्यात एकुण चौदा विद्यार्थ्यांचा सहभाग होता. निकिता मानुसमारे, पल्लवी गहुकर, कृतीका निखाडे, प्रियांका पिसे, साक्षी वैद्य, प्राजक्ता किन्नाके, जान्हवी किनाके, कोमल मिलमिले, आचल चिकटे, करिश्मा इरपाची, जया आगलावे, वृशाली ठाकरे, पुजा नांदे, आदित्य कडबे, ह्या कलाकारांनी सर्व गावांत पथनाट्य सादर केले. सोबत सर्व गावांत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक उपस्थित होते. उन्नत भारत अभियाना चे पथनाट्यातून व्यसनमुक्ती जनजागृतीचे हे मिशन यशस्वी रित्या पार पाडले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close