ताज्या घडामोडी

महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारे सहजं सुचलं व्यासपीठ -सराेज हिवरे

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

सहजं सुचलं हे महिलां व तरुणींच्या कला गुणांना वाव व प्रोत्साहन देणारे एकमेव व्यासपीठ असल्याची प्रतिक्रिया पतंजलीच्या राजूरा निवासी सराेज हिवरे यांनी रविवारी यांनी व्यक्त केली .त्या चंद्रपूर मुक्कामी एका कार्यक्रमा निमित्ताने आल्या असतांना त्यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आपली सहजं सुचलं विषयी प्रतिक्रिया दिली सहज सुचलंला उंच कळसावर नेण्यास जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे , मेघा धोटे, सुविधा बांबाेडे , प्रभा अगडे , सिमा पाटील , मंथना नन्नावरे , वंदना आगरकाठे , सारीका खाेब्रागडे , सविता सातपुते , विजया तत्वादी ,विजया भांगे , वंदना हातगांवकर , शाेभा राेकडे , भारती मैदपवार ,मनिषा मडावी पुनम रामटेके , प्रतिमा नंदेश्वर , अर्चना चावरे , छबूताई वैरागडे , रजनी पाेयाम, रजनी रनदिवे , श्रूति उरनकर , नंदिनी लाहाेळे व इतरही काही महिला सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.असे हिवरे या वेळी म्हणाल्या .आळस हा माणसाचा शत्रू आहे असे नेहमी सांगणा-या उत्साही व अविरत कार्य करणा-या सहज सुचलंला नागपूरच्या डाँ .स्मिता मेहेत्रे यांचे महत्वाचे योगदान लाभले आहे .सहज सुचलंवर त्या आजही तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहे .महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात सामाजिक बातम्या पत्रांमुळे सहज सुचलंचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आहे .प्रत्येकांच्या कलागुणांची बातमी प्रकाशित करण्यांचे काम हे सहज सुचलं नित्य नियमाने करीत आहे .राजकीय गंध न लागता सामाजिक बातम्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे काम सहजं सुचलंने आज पावेताे केले आहे इतकेच नाही तर या ग्रूपने सर्वांचे सुख दुःख वाटून घेतले आहे .वर्धा जिल्ह्यातील कु. रितू लोहकरे हिच्या संकल्पनेतून सहज सुचलं आजही डौलाने उभे आहे .महाराष्ट्रातील अनेक नामवंत व नवीन सदस्य सहज सुचलं मध्ये सामील झाले आहेत .आजची सहजं सुचलंची सदस्य संख्या १५००च्या घरात पाेहचली आहे . हा गृप चंद्रपूर जिल्ह्यापुरताच मर्यादीत नसून पुणे,मुंबई व मराठवाड्याच्या टोकापर्यंत जाऊन पोहचला आहे.उपराेक्त ग्रुपमधे महिलांच्या अंगी असणांऱ्या सुप्त गुणांना वाव दिला गेला आहे तसेच त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन सदाेदीत योग्य मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणती तरी कला,कौशल्य व एखादा तरी गुण असतोच .त्याचा शोध घेता आला पाहिजे. तो घेण्याचा प्रयत्न करावा .मला काहीच जमणार नाही असा न्यूनगंड मनात कुणीही बाळगू नये .कामाचे कोणतेच क्षेत्र वाईट नाही ज्या गोष्टीची आवड आहे ते करावे त्यामुळे दुसऱ्यांना कला दाखवताना दुसऱ्यास आनंद देत असताना दुपटीने आनंद स्वतःस मिळेल असे मत सहजं सुचलंच्या मूलच्या जेष्ठ कवयित्रि स्मिता बांडगे यांनी व्यक्त केले.कला प्रदर्शित करायला वयाचे बंधन नसते आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आपली कला जोपासू शकतो .वाचन कला जोपासून ज्ञान वाढवू शकतो .दुसऱ्याच्या कला गुणांना प्रोत्साहन देऊ शकतो. असे ही बांडगे या वेळी म्हणाल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close