शिवसेनाच्या वतीने बाळा साहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमुर येथे आरोग्य शिबिर
- शिबिराचा लाभ घ्यावा शिवसेना तर्फे आव्हान.
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमुर तालुका व हीलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमुर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हीलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे.
शिबिरामधे डॉ, प्रदीप पंचभाई स्त्री रोग तद्द व डॉ अशोक वनकर जनरल फिजिसियन यांचे नेतृत्वात अस्थिरोग, वंधत्व निवारण सल्ला, गर्भाशयाच्या गाठी, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मासिक पाळी, स्त्रियांचे सर्व आजार, हर्निया, हाइड्रोसिल, अपेंडिक्स, मुळव्याध, भगन्दर, वारंवार ताप येने, पोट दुखी, सांधे दुखी, हातपायाला सूज येणे व अन्य प्रकारच्या आजरावर निदान करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधिचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व भारतीय विद्यार्थी सेना चिमुर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.