रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले पक्ष)बैठक संपन्न !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले पक्ष)बैठक संपन्न !
बैठकीला अनेकांची उपस्थिती .
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चंद्रपूर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाची (आठवले पक्ष) बैठक नुकतीच पार पडली.राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री .ना.डॉ. रामदासजी आठवले यांच्या एका आदेशानुसार रिपाई (आठवले) पक्षाची चंद्रपूर जिल्ह्याची नविन कार्यकारणी स्थापन करण्याचे आदेश झालेले आहे .
जिल्हा कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे नव्याने लोकशाही पद्धतीने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी येथील स्थानिक वसंत भवन जटपूरा गेट जवळ जिल्हा कार्यकरणीची बैठक तातडीने घेण्यात आली सदरहु बैठकीचे अध्यक्षस्थान अशोक घोटेकर यांनी विभुषित केले होते.
बैठकीला तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. दरम्यान जिल्हाध्यक्षाची एकमताने निवड करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांकडून आग्रह होत होता.तर विदर्भस्तरावर आठवले यांची बैठक लावून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी या वेळी सुचना केल्या सर्वप्रथम जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतरच तालुका व ग्रामीण भागाच्या अध्यक्ष पदाची निवड करण्याचेही या वेळी ठरविण्यात आले . प्रत्येक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) पक्षाची भूमिका घराघरात पोहचावी असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. आयोजित बैठकीला सुमित चंद्रागडे , संजीव खोब्रागडे , बादल हजारे , अमित सरकार , किरण गेडाम , राहुल मुन , गौतम तोडे , राकेश अलोने ,
उदय कोकोडे , प्रकाश मडावी, जितेंद्र देठे , गौतम धोटे , रविदास करमनकर, प्रभाकर खाडे , विठ्ठल क्षीरसागर , मनोहर सिडाम ,
भैय्याजी उईके , शैलेश राखुंडे , निलेश तितरे , नागसेन डांगे ,
.गीता साखरे , राजू जंगाम , शीला साखरे , ऍड.विनोद वानखेडे , सागर देवगडकर , गौतम भसारकर आदीं उपस्थित होते .