वन हक्क दावे घेऊन अपील साठी आप्पापली येतील नागरिक नागपूर रवाना
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार
सत्तर नागरिकांना नागपूर जाण्यासाठी ट्र्वल्स ची व्यवस्था
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील आप्पापली येतील अतिक्रमण केलेले सत्तर नागरिकांनी रितसर पणे वन हक्क दाव्याच्या अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले होते.
मात्र जिल्हाधिकारी यांनी अपात्र करून नागपूर आयुक्त कार्यालयात अपील करण्याच्या पत्र नागरिकांना पाठवण्यात आले,त्याअनुषंगाने नागरिकांनी तृटीच्या पूर्तता करून नागपूर आयुक्त कार्यालयाकडे जायचं होत मात्र आर्थिक पाठबळ नसल्याने जायचं कसे असा प्रश्न नागरिकांना पडला यांबाबत जिल्हा परिषद् अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना आपबिती सांगण्यात आले तेंव्हा जि.प.अध्यक्ष यांनी मि मदत करतो,तुम्ही दावे नागपूर ला घेऊन जा असे सांगत सत्तर नागरिकांना जाण्यासाठी एक ट्रॅव्हल्स ची व्यवस्था करून दिली व लागणार्या खर्चसाठी आर्थिक मदत करून नागपूर आयुक्त कार्यालयात दावे घेवून पाठवण्यात आले.