अज्ञात टॅक्सी च्या धडकेत दोन म्हशी ठार
आक्सापुर येथील घटना
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी
दि.18 जानेवारी रोज मंगळवारला अज्ञात टॅक्सी च्या धडकेत दोन म्हशी चा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. आक्सापुर येथील चंद्रशेखर विठ्ठल कीरमे या शेतकऱ्याच्या चार म्हशी नेहमीप्रमाणे चराईसाठी जाऊन परत येत असताना अज्ञात काळीपिवळी ची धडक बसून दोन म्हशी जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाल्या ची घटना घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर गावालगत नवज्योती चर्च जवळ घडली. कोठारी कडून गोंडपिपरी कडे येणारी अज्ञात काळी पिवळी ने शेतकरी चंद्रशेखर विठ्ठल किरमे यांच्या मालकीच्या चार म्हशी घराकडे परत येत असताना त्या म्हशीला जबर धडक दिल्याने दोन म्हशीचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाल्या त्या काळी पिवळी ची धडक एवढी भीषण होती की त्या अज्ञात काळी पिवळी ट्रक्स चा बोनेट व फोर्स कंपनी लिहून असलेला टप्पर घटनास्थळी सापडला.
सदर घटनेत या शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती कोठारी पोलीस स्टेशन ला देण्यात आली असता कोठारी चे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात काळीपिवळी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीट जमादार हुलके हे करीत आहेत.