भामरागड येथे डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या अध्यक्षेतेखाली आढावा बैठक संपन्न
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
तालुका भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प स्तरीय नियोजन व आढावा समितीचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या अध्यक्षेतेखाली प्रकल्प अधिकारी गुप्ता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन विविध योजना बाबत चर्चा करून माहिती घेतले.
तालुका भामरागड व एटापल्ली या डोंगराळ व अति दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीचे सामाजिक व शैक्षणिक प्रगती होऊन क्षेत्रविकासाचा दृष्टिकोनातून त्या भागाचा मुलभूत विकास होऊन त्याचा फायदा सर्वांना व्हावा, त्याचप्रमाणे आदिवासींच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल या उद्देशाने बारमाही विविध प्रकारचे पिक घेऊन, वार्षिक उत्पन्न सुरळीत होईल व आदिवासींचा वयक्तिक व कौटुंबिक विकास होण्यास मदत होईल अश्या पद्धतीने विविध योजना सह विविध विषयांवर डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार यांनी चर्चेतून व्यक्त केले. यावेळी प्रकल्प अधिकारी गुप्ता व नियोजन व आढावा समिती चे सदस्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली.
यावेळी प्रकल्प स्तरीय नियोजन व आढावा समिती चे सदस्य सह भागातील नागरीक यांच्या उपस्थितीत भामरागड तालुक्याच्या विकास व भागातील जनतेचा विकास याबद्दल चर्चा करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य लालसू नागोटी, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजु वड्डे, चिन्ना महाका, रमेश बोलेमपल्लीवार, विजय कड्यामी, लक्ष्मीकांत बोगामी, तानाजी धूर्वा, लक्ष्मण नरोटे, आसिफ भाई, जाफर भाई रामा माहका, दवू शेडमाके, संजय गावडे आदी उपस्थित होते.