ताज्या घडामोडी

क्रांतीवीर भाई कोतवाल पुण्यतिथी

प्रतिनिधी: गणेश पगाडे

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तालुका शाखा साकोलीच्या वतीने श्री.संत लहरीबाबा मठ देवस्थानच्या सभागृहात क्रांतीवीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम क्रांतीवीर भाई कोतवाल उर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाला लाभलेल्या पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर आपल्या उद्घाटीय भाषणात पूर्व विदर्भ युवा अध्यक्ष श्री. शरदराव उरकुडे यांनी भाईंच्या जीवनावर प्रकाश टाकत युवकांना योग्य मार्गदर्शन केले. म.ना.म. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री. मितारामजी पोवनकर यांनी समाज व समाजाच्या व्यथा यावर सुंदर मार्गदर्शन केले. तालुका महिला अध्यक्षा श्रीमती मायाताई लांजेवार यांनी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या नाभिक समाजाला बचत गटाच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे संकटाला सामोरे जाऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात म.ना.म. जिल्हा भंडारा चे अध्यक्ष श्री. जगदीशजी सुर्यवंशी यांनी समाज संघटन व समाजातील पारिवारिक घडामोडी यांचे विश्लेषण करीत उपस्थित समाज बंधू भगिनींसोबत संवाद साधला.
सदर कार्यक्रमात १० वी व १२ वी च्या २०२१ _२०२२ या सत्रात प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व प्रोत्साहन बक्षीस देऊन सत्कार, समाजकार्यात योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार, तसेच उपवधू वर परिचय असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून कार्यक्रमाला सुशोभित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष श्री. जगदीशजी पोवनकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता तालुका सचिव श्री. नागेशजी लांजेवार यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक युवा मंच तसेच सर्व सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close