ताज्या घडामोडी

भरधाव टिपरच्या धडकेत दोन सखे भाऊ ठार

वडिलांची जीवन मरणाशी झुंज.
नोटबुक पेन घेणं जीवावर बेतल.

शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
मो.8390085197

मुडिकोटा. तुमसर कडून तिरोडया कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टिपरने मुडिकोटा बस स्थानका जवळ मुडिकोटा हुन तुमसर कडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला 29 जुन रोजी सायंकाळी 7-30 वाजता च्या सुमारास जबर धडक दिली. यात मुलगा पियुष जागीच ठार झाला तर एक गस्वीक्त जखमी मुलगा दुर्ग ह्याचा वाटेत निधन झाले तर दुचाकी स्वार पिता सुरेश कांबळी हे गंभीर जखमी असल्याने भंडारा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत आहे.
स्वीस्तर वॄत असे की नुकताच शाळा सुरू झाला असून पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या तयारी ला लागले असून सुरेश आपल्या दोन्ही मुलाच्या खरेदी साठी घाटकुरोडयाहुन मुडिकोटा येथे आले होते घोगरा रेल्वे चौकी येथे तीन दिवसाचे मेघा ब्लॉक असल्याने पाटील टोला भुयारी मार्गाने घाटकुरोडा वाशियाना प्रवास करावा लागत असल्याने सुरेश काबंळी वय 49 वर्षे. दुर्ग सुरेश काबंळी वय 16 वर्षे. पियुष सुरेश काबंळी वय12 वर्षे हे मुडिकोटा वरुन नोटबुक. पेन. व काही शालेय साहित्य खरेदी करुन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घाटकुरोडा येथे जाण्यासाठी मुडिकोटा बाजारातुन राज्य मार्ग 249 वरुन पाटील टोला फाटा मार्ग जाण्यासाठी निघाला होता परंतु मुडिकोटा बस स्थानक ओलांडून आपल्या मार्गाला लागतानी लागता तुमसर कडून तिरोडा कडे जाणाऱ्या भरधाव टिपरने बेसावध व हयगय पने दुचाकी मोटार सायकल एम एच 36 पी 6585 ला जोरदार धडक देउन टिपर चालक टिपरसह पसार झाला अपघात घडताच नागरीकांनी धाव घेत अपघाती इसमाना लगेच मदत देत त्यांना तुमसर येथे उपचारासाठी रवाना केले मॄत्काला तिरोडा येथे रवाना केले
घटनेची माहिती पोलीसांना मिळताच त्यानी घटना स्थळी धाव घेतली व पोलीसांनी देखील आपला ससे मिरा लावून टिपर पकडले त्याचे व्हेरिफिकेशन सुरू असल्याचे सांगितले असून चालक यांच्या वर गुन्हा दाखल करुन अटक केल्या चे सागीतले आहे.
पियुष ह्याचे मॄत देह उप जिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले होते तर सुरेश कांबळी ह्याना भंडारा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले मुलगा दुर्ग गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले होते पुढील उपचारा करीता नेत असताना त्याचा वाटेतच रात्री 10 वाजता च्या सुमारास निधन झाले या घटने ने घाटकुरोडा गावात आणि परिसरात शोकाकु ल वातावरण तयार झाले असून सर्व त्र शोककळा पसरली आहे.
उल्लेख नीय असे की टिपरच्या धडकेने दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत नुकतीच घटना घडून आली तिची जखम ताजी असताना पुन्हा टिपरच्या धडकेने दोन निरागस विध्यार्थी चा अपघाती निधन झाल्याने टिपर विषयी असंतोष निर्माण होत आहे. सदर टिपर मुरमाचा वाहक करणारा असुन विनभोभाट अवैध उत्खनन सुरू आहे. टिपर मालक यांचा तालुका महसूल प्रशासन. खनिकर्म विभाग आणि पोलीस प्रशासन याचेशी संगनमत असल्याने दिवशी ढवळया मुरुम तस्करी सुरू असलयाचे परिसरात चर्चैचा विषय जोरात आहे किमान आता तरी प्रशासन जागा होणार का ॽ या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे दार योगेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली जोगदंड. धावडे. बर्वे. साळवे हे करीत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close