नेरी येथे प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आज दि. 22 जाने.2024 ला प्रभू रामचंद्र मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य हनुमान मंदिर देवस्थान (श्री गुरुदेव शिवा मंडळ व हेमाळपंती मंदिर जवळ) नेरी येथे भजन, आरती व राम खिचडीचे वाटप तसेच कारसेवकांचा सत्कार, रामरक्षा पठण करून आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रम सकाळी दहा वाजता रामरक्षा पठण करून भजन व आरती करून सुरुवात करण्यात आली. अयोध्या श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रोजेक्टवर दाखवण्यात आला. त्यानंतर लगेच कारसेवकांचा सत्कार करण्यात आला त्यात तीनदा कारसेवा करणारे डॉ. श्यामजी हटवादे आणि संभाजी गावतुरे या कारसेवकांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथील बाल स्वयंसेवकांचा भगवा दुपट्टा देऊन भजन मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार श्री गुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष दादाराव पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सत्कारमूर्ती कारसेवक डॉ. श्यामजी हटवादे यांनी तीनदा केलेल्या कार्याची आपबिती व कार्यामध्ये आलेले अडथळे याचे विस्तृत वर्णन करून उपस्थित राम भक्तांना मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाची सांगता राम खिचडी ने करण्यात आली. राम खिचडीचे दाते दिनकर खानोरकर, दिलीप फाये, आशुतोष बोलधने, सतीश अष्टनकर होते. कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पाडण्यात आला. उपस्थित सर्वांचे आभार बालु पिसे यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.