ताज्या घडामोडी

महायज्ञ आरोग्य शिबीराचा

काळजी माय- माऊल्यांची…

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं झालं आहे. वेळेवर उपचार किंवा इलाज केले नाहीत तर मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. संसाराची जबाबदारी पार पाडणा-या आजच्या महिला सक्षम आणि प्रगत आहेत.

परंतु घरच्या जबाबदारा-यांमुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या संकल्पनेतून, शासकीय योजना मोफत मदत केंद्र व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद गंगाखेड ,संत जनाबाई महाविद्यालयाचे एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत जनाबाई कॉलेजच्या सभागृहामध्ये खास महिलांसाठी भव्य असे आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले.
त्याच बरोबर डॉ.रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकतेकडे वळावे व ज्या महिलांचे व्यवसाय आहेत त्यांना स्वतंत्र मार्केट उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत गटातील महिलांना निराशेला सामोरे जावे लागते म्हणुन आमदार साहेबांनी उद्योग करणाऱ्या महिलांना भविष्यात स्वतंत्र मार्केट ची उपलब्ध करुन देऊ असे सांगितले , बँकेच्या माध्यमातून महिलांना सहकार्य कशा पध्दतीने मिळु शकेल यावर मोठ्या प्रमाणात सहकार्य करु असे सांगितले ,ब्युटी पार्लर व टेलरींग चे प्रशिक्षण घेतलेल्या महिला व मुलींना प्रमाणपत्राचे वितरण आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला ,यावेळी नवउद्योजक महिलांचाही सन्मान करण्यात आला, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरीषद गंगाखेड च्या प्रकल्प अधिकारी अंजना कुंडगीर मॕडम यांनी महिलांच्या वतीने विविध प्रमुख समस्यांची मांडणी केली. यावेळी आरोग्य शिबीरासाठी डॉ.योगेश मुलुरवार,डॉ.ज्योती इप्पर, आदि डॉक्टरांनी उपस्थित राहून महिलांना योग्य ती तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन केले. या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये महिलांसाठी मधुमेह तपासणी, ईसीजी, थॉयराईड, सीबीसी,हिमोग्लोबिन आदी तपासण्या पीआरएस डायग्नोस्टिकच्या माध्यमातून करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. चंद्रकांत सातपुते होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, रासपा जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजीराव पवार, नगरसेवक सत्यपाल साळवे,इंतेसार सिद्दिकी, प्रा.डॉ.सुर्वे सर, प्रा.डॉ.बेले सर,प्रा.डॉ.चव्हाण सर, सौ.रंजना हानवते,सौ.लक्ष्मीबाई आडे, सुनीता घाडगे, सूर्यमाला मोतीपवळे संगीता जामगेयांच्यासह विविध पदधिकारी व मान्यवर व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी अंजनाताई बीडगर यांनीबू केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरयु गुट्टे व प्रतिक्षा वझे तर आभार जयमाला हजारे यांनी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close