ताज्या घडामोडी

गोपाल मुंदडा व मुग्धा खांडेंचे नेतृत्व- स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी टीम घेतेय अथक परिश्रम

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाने स्थानिक महानगर पालिका आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असून गुरुवारला त्यांनी वृक्षारोपण केले. सोबतच रंगवटीचे काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत होते .ती जागा पूर्णता स्वच्छ करून तेथे एका कृष्ण मूर्तीची त्यांनी स्थापन केली. जेणेकरून लोक आता परत त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही.महानगर पालिकेच्या या उपक्रमामुळे आम्ही तर जागे झालोच पण इतर नागरिकांना सुध्दा जागे करण्यात आम्ही भरभरुन यश मिळवित असल्याचे मुग्धा खांडे म्हणाल्या. आज स्वतःहून लोक पुढे येऊन मदत करीत आहेत ही खरंच आमच्या साठी आनंदाची बाब आहे.
या यशाचे श्रेय ख-या अर्थाने आमच्या टीमचे मार्गदर्शक गोपालजी मुंदडा यांना जाते. हे सांगण्यास मुग्धा खांडे या वेळी विसरल्या नाहीत .विशेषतः मंगेश खोब्रागडे, रंजना मोडक सुरेश घोडके, सूरज घोडमारे, आकाश घोडमारे,किशोरी हिरुडकर, पुनम पिसे, मयुरी हेडाऊ, मीना निखारे, रवी निखारे, शिवानी कुलकर्णी, , रुबी, शेख, बाळकृष्ण माणूसमारे, पांडेजी, पिंपलकर, विनोद कामनवार, चंद्रशेखर मुनगंटीवार, नागापुरे अलका मून, अलका गुप्ता, सविता उराडे,साहिल चौधरी व अन्य सभासदांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचे ह्या टीमच्या संघ प्रमुख मुग्धा खांडे शेवटी म्हणाल्या .एकंदरीत सध्या तरी या टीमचे काम अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. हे मात्र तेव्हढेच खरे आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close