ताज्या घडामोडी

सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे तिरंगा ध्वज व गणवेश वितरण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमात संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांची उपस्थिती..!!

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

सरस्वती ज्ञान मंदीर, नागभीड येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.. यातून विद्यार्थ्यां मध्ये राष्ट्रभक्ती हे मूल्य रूजविण्याचे कार्य सुरू आहे.. देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी यांनी आवाहन केल्यानुसार ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या माध्यमातून आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मोफत भारतीय ध्वज,काठी तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वितरण करण्यात आले….!!
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष संजय गजपुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रमेश पाटील बोरकर, भाजप ज्येष्ठ नेते वामनजी तलमले,पालक प्रतिनिधी ईश्वरजी नागरीकर,शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे सर यांची उपस्थिती होती… सदर कार्यक्रमात बांबु काठीसह २०० भारतीय तिरंगा ध्वज व २२० शालेय गणवेश मोफत वितरित करण्यात आले. सर्व पालकवर्गांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन दिलेला हा तिरंगा ध्वज आपल्या घरावर १३ ते १५ ॲागस्ट या कालावधीत सन्मानाने लावून राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहा.शिक्षक आशिष गोंडाने,पराग भानारकर, सतीश जीवतोडे,सहा.शिक्षिका आशा राजूरकर ,किरण वाडीकर ,भावना राऊत,पूजा वीर,अंकिता गायधने,श्रद्धा वाढई यांनी सहकार्य केले…!!!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close