श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाची श्रेया कुंभकर्ण हिची नवोदय विद्यालयात निवड
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु श्रेया सुनील कुंभकर्ण हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पुर्व परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.तिची निवड इयत्ता ९ वी साठी जवाहर नवोदय विद्यालयात झाली आहे. कु श्रेया सुनील कुंभकर्ण हिने मिळवलेल्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य, सौ कल्पनाताई चौसाळकर, श्री सिध्देश्वर संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी, पर्यवेक्षक उमेश थाटकर, दिलीप चव्हाण मिलींद वेडे आदिंनी अभिनंदन केले