योगेश्वरी शुगर्सच्या वतीने ऊस वाहतुक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर बसवले
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर लिंबा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ,ट्रॅक्टर ,मिनी ट्रॅक्टर यांना शुक्रवार २३ डिसेंबर रोजी रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून रेडियम रिफ्लेक्टर चमकत असते,त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी होते. त्याकरिता कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार आर.टी. देशमुख जीजा व कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित भैया देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
त्यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे केन मॅनेजर वसंत चरमळ चीफ इंजिनिअर प्रमोद देशमुख केन यार्ड सुपरवायझर पांडुरंग जाधव रिफ्लेक्टर पुरवठादार सुरेश गिराम व ऊस तोड वाहतूक ठेकेदार ,कंत्राटदार ड्रायव्हर आदींची उपस्थिती होती.