आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड चे थाटात उद्घाटन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दिनांक 18 फरवरी 2022 ला पार पडला.या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून महारोगी सेवा समिती चे विश्वस्त श्री सुधाकर कडू ,अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सौ.राधा सवाणे,तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.त्यानंतर पाहुण्याच्या हस्ते तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थित सर्व पाहुण्यांना राष्ट्रीय छात्र सेना तसेच सर्व महाविद्यालयातील वर्गाच्या विद्यार्थ्यांनकडून मार्च पास आणि बँड पथक यांच्या द्वारे मानवंदना देण्यात आली.त्यानंतर रोषणा गड्डे, अर्चना तोडसम,दर्शना भिवादरे, जान्हवी मानकर, वैष्णवी निखाडे या राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेटती मशाल मैदानातून धावत आणत मंचावर येऊन क्रीडा ज्योत मिरवली.
राष्ट्रीय खेळाडू हेमंती भुजाळे हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाच्या मल्लखांब खेळाडूंनी टांगत्या मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके करून उपस्थित सर्वांची मने जिंकली .सर्व पाहुण्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि श्री सुधाकर कडू यांनी या तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड चे उद्घाटन झाले असे जाहीर केले.या वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात रस्सीखेच या स्पर्धेने करण्यात आली. त्यामध्ये पहिला सामना हा विशेष क्रीडा प्रशिक्षण मधील क्रीडा प्रशिक्षकांनमध्ये रंगला त्यानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये दुसरा सामना रंगला. या दोन्ही सामन्यामध्ये अतीशय चुरशीच्या लढती झाल्या.हा क्रीडा मोहत्सव संपूर्ण एक महिना भर चालणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व खेळाडू , क्रीडा प्रेमी तसेच पालक सुद्धा उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे संचलन महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू महेश सोनवणे आणि अमित दातारकर यांनी केले,तर प्रास्ताविक राष्ट्रीय खेळाडू कुणाल दातारकर यानी केले आणि आभार प्रदर्शन अक्षीता तिखट हिने केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर नियमित सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंनी केले.