आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मयूर राईकवार, तर महानगर अध्यक्षपदी योगेश गोखरेंची नियुक्ती
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
महाराष्ट्र राज्याचे GC प्रदेश प्रभारी गोपाल इटालिया आणि प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी मयूर राईकवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महानगर अध्यक्षपदी योगेश गोखरे यांचे निवड करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन आणि विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्याच दृष्टीने पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक बदल करण्यात आले आहे.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार हे पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य असून, यापूर्वी देखील त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे. त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील ज्वलंत आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम आज पावतो केलेले आहे. दरम्यान या पूर्विचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांना बढती मिळणार असल्याची चर्चा ऐकिवात आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राईकवार हे मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत.या शिवाय आगामी काळातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी लढविणार असुन प्रामाणिक आणि भ्रष्टाचार मुक्त चंद्रपूर घडविण्यासाठी जनतेनी आम आदमी पार्टीच्या सोबत राहावे असे आवाहन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केले आहे.अनेकांनी मयूर राईकवार यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे
चंद्रपूर जिल्हा समितीमध्ये अजय पिसे (उपाध्यक्ष), नावेद खान (उपाध्यक्ष), योगेश मुन्हेकर (उपाध्यक्ष), विक्रम झांबरे (उपाध्यक्ष), विनोद खोब्रागडे (उपाध्यक्ष), सौरभ रनदिवे (उपाध्यक्ष), भिवराज सोनी (संगटनमंत्री), नागेश्वर गंडलेवार (संगटणमंत्री), सरफराज शेख (कोषाध्यक्ष), संतोष दोरखंडे (सचिव), अनुकूल शेंडे (सहसचिव), प्रा. प्रमोद बुचुडे (सहसचिव), प्रतीक विराणी (प्रवक्ता), देवनाथ गंडाटे (मीडिया प्रमुख) राजेश चेडगुलवार
(सोशल मीडिया प्रमुख), भूषण तपासे
(विद्यार्थि आघाडी अध्यक्ष), दीपक बेरशेट्टीवार (शेतकरी आघाडी अध्यक्ष)
उदय मोहितकर (शिक्षक आघाडी अध्यक्ष) सूर्यकांत चांदेकर (कामगार आघाडी अध्यक्ष), हर्षवर्धन बोरकर (अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष)
रितीक पेंदोर (अनुसूचित जमात आघाडी अध्यक्ष), धनराज रडके (ओ.बी.सी आघाडी अध्यक्ष), नासिर शेख (अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष), मधुकर साखरकर (सहकार आघाडी अध्यक्ष), जगजितसिंग भामरा (व्यापारी आघाडी अध्यक्ष), शंकर धुमाळे (ऑटो आघाडी अध्यक्ष), अॅड किशोर पुसलवार (लीगल सेल अध्यक्ष), अॅड. राजेश विराणी (सल्लागार) यांचा समावेश आहे.