ताज्या घडामोडी

परभणी जिल्ह्याचा खेळाडू रोहन ढाणे करणार भारताचे नेतृत्व

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मोंटॅक्स बोल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोंदिया येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय मॉंन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्याचा रोहन ढाणे हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होता. महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषण त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. त्या त्यामुळेच त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली. आज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व नवे तर पोखरा, नेपाळ येथे 21 ते 25 एप्रिल रोजी होणाऱ्या मोंटॅक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.हा खेळाडू पाथरी तालुक्यातील तुरा या गावचा आहे. शांताबाई नखाते विद्यालय मध्ये तो अकरावी विज्ञान या शाखेत सध्या शिक्षण घेत आहे .या खेळाडूचा सत्कार परभणी जिल्हा मोंटॅक्स बोल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य भैय्या नखाते यांनी केला या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक व परभणी जिल्हा मोंटॅक्स बॉल क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव किशन डहाळे ,बाळासाहेब गायकवाड, परभणी जिल्हा मोंटॅक्स बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम शेळके , परभणी जिल्हा मोंटॅक्स बोल क्रिकेट असोसिएशनचे सचिव भरत घांडगे, व सदस्य सहदेव पुरी सर, उपस्थित होते .या खेळाडूला पुढील स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close