सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी
आज दि.३ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवानी अंतरवली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना भेट दिली. व सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी सकल मराठा समाजाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मराठा समन्वयक बाळासाहेब रेंगे, संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक किशोर रणेर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, मराठा सेवा मंडळ महानगर अध्यक्ष गोवंद इक्कर, आकाश कदम, मंगेश भरकड, राम भालेराव, प्रदीप भालेराव, सतीश जाधव, कैलास पौळ, कैलास पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना चे किशोर ढगे, रामेश्वर आवरगंड, बाळासाहेब घाटोळ, अंगद मस्के, सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.