ताज्या घडामोडी

सिंदेवाही तालुक्यात आदिवासी माना जमातीचा भव्य लक्षनीय मोर्चा

शिवाजी मोघे यांच्या असंविधानिक वक्तव्याचा निषेध.

सिंदेवाही मूल सावली तीन तालुक्याचा सहभाग .

प्रतिनिधी:गणेश चन्ने

शिवाजी मोघे यांच्या माना जमाती विरोधात असंविधानिक वक्ताव्याचा निषेध करत सिंदेवाही तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा मोर्चा काढुन शिवाजी मोघे याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.


काही दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक 18 सप्टेंबर रोजी नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस निमित्याने अध्यक्षीय भाषणामध्ये “माना जमात ही बोगस असून, जी काही सोई सवलत ही गोंड माना ला असून आमची जर सत्ता आली तर आम्ही माना जमातीला आदिवासीतुन बाहेर काढू” असं भाषणात बोलले. परंतु “माना” ही स्वतंत्र जमात असून संविधानाच्या कलम 342 मध्ये माना जमातीचा उल्लेख यादीमध्ये 18 व्या क्रमांकावर असून शिवाजी मोघे याने संविधानाला फाटा देत संविधानाचा व सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत असंविधानिक बोलले असून, या वक्तव्यामुळे माना समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे मोघे विरोधात प्रत्येक स्तरावरून समाज बांधवाकडून संतप्त रोष व्यक्त केल्या जात आहे. आज तालुक्यातील संतप्त माना समाजाने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काडून निषेध नोंदवला.
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना तालुका अध्यक्ष श्री. धीरज भाऊ दांडेकर यांच्या नेतृत्वात आठवडी बाजार सिंदेवाही पासून दुपारी 12.00 वाजता पासून निषेध मोर्चाला सुरवात झाली.
मोघे विरोधात घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसील कार्यालयच्या पाटांगणात एकत्र होऊन मोर्चाला संबोधित करण्यात आले. त्यानंतर शिष्ट मंडळ च्या वतीने तहसीदार साहेबांना निवेदन देण्यात आले व पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आले.
यावेळी उपस्थित आ. मा. ज. वि. युवा संघटना सिंदेवाही तालुका अध्यक्ष श्री. धीरज दांडेकर, कार्याध्यक्ष अमोल नागोसे, प्रसिद्धी प्रमुख अमोल नन्नावरे, सचिव हितेश चौधरी, संपर्क प्रमुख शेषराव कारमेंगे, सल्लागार सुभाष कारमेंगे, सल्लागार विवेकानंद चौके सर,पराग दोडके सर, कृष्णा श्रीरामे, स्वप्नील श्रीरामे, रवी धारणे सर, जिवतोडे साहेब, चंद्र शेखर घोडमारे, जीवन जी भरडे,गुरु शेरकुरे, मूल तालुका अध्यक्ष, सावली तालुका अध्यक्ष, व आदिम माना जमात मंडळ चे पदाधिकारी आदि. समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close