शरद उरकुडे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ, युवा आघाडी, विदर्भ (पूर्व) विभाग अध्यक्ष पदावर पदोन्नती

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
दि. 25/12/2021 ला भंडारा येथील शिवम हॉटेल च्या सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळ, भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत विभागीय कार्यकारिणीच्या उपस्थितीत महाराष्ट्र नाभिक महामंडळ, युवा आघाडी, विदर्भ (पूर्व) विभाग च्या विभागीय युवक अध्यक्ष या पदावर पदोन्नती झाली. यावेळी त्यांनी “हि फक्त माझी पदोन्नती नसून खऱ्या अर्थाने नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा च्या युवकांच्या गतकालीन सामाजिक सामूहिक सत्कार्याचा सम्मान आहे” अशा भावना अभिव्यक्त केल्या.

सदरील नियुक्ती विषयक त्यांनी प्रदेश अध्यक्ष दत्ताजी अनारसे, कार्याध्यक्ष अंबादासजी पाटील, उपाध्यक्ष बंडूभाऊ (सुधीर) राऊत, प्रदेश सरचिटणीस दिलीपजी अनार्थे, विदर्भ (पूर्व) विभागीय अध्यक्ष श्यामजी आस्करकर सर, कार्याध्यक्ष रोशनजी उरकुडे, प्रसिद्धी प्रमुख संजयजी चन्ने, नागपूर जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी, सरचिटणीस श्री राजेंद्रजी इंगळे, कार्याध्यक्ष राजेंद्रजी फुलबांधे, भंडारा जिल्हाध्यक्ष जगदीशजी सुर्यवंशी, कार्याध्यक्ष अशोकजी फुलबांधे यांचे आभार व्यक्त केले. तसेच नियुक्तीचे श्रेय म.ना.म. नागपूर जिल्हा सचिव विनेशजी कावळे,युवा आघाडी अध्यक्ष राजूजी चिंचाळकर, सौ.भावनाजी कडू, नाभिक कौशल्य विकास समिती नागपूर चे प्रशिक्षक धरम सर, म.ना.म. भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदजी मेश्राम सर, माजी जिल्हाध्यक्ष मधुभाऊ फुलबांधे, प्रसिद्धी प्रमुख मितारामजी पोवनकर, महिलाध्यक्ष सौ जोत्सनाताई सुर्यवंशी, नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा अध्यक्ष रवि लांजेवार, माजी उपाध्यक्ष राजूभाऊ सुर्यवंशी, सचिव आदिनाथ सुर्यवंशी, उपाध्यक्ष सत्यवान मेश्राम, कोषाध्यक्ष सचिन फुलबांधे भंडारा तालुका अध्यक्ष सुधीर उरकुडे, भंडारा शहर अध्यक्ष अनंता वलुकार, म.ना.म. गोंदिया जिल्हाध्यक्ष स्वीय बेनिरामजी फुलबांधे, गोंदिया जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष प्रकाश शिवणकर, म.ना.म चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी किर्तने, गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष तुषारजी चोपकर व वर्धा चे जिल्हाध्यक्ष विशालजी खैरकर व समस्त जेष्ठ व युवकांचे आभार व्यक्त केले
पदानुरूप दायित्व निर्वाचन करण्यास जेष्ठांचा आशिर्वाद व युवकांची साथ, प्रेम, आपुलकी, विश्वास सदैव कायम राहिल व सर्वांच्या सहकार्याने आपले सामाजिक सत्कार्य अधिक गतीमान होईल हि संत सेनाजी व संत नगाजी चरणी ईश्वरीय मनोकामना व्यक्त केली व सकल समाज सेवेशी इच्छुक युवकांनी सभासद बनून सत्कार्यात सहभाग घ्यावे व सुंदर व सुशील समाज निर्मितीत आपले अमूल्य सृजनशील योगदान करावे असे आव्हाहन केले.