ताज्या घडामोडी

म.रा.प्रा.शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

म.रा.प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने विविध समस्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.या निवेदनात पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.आंतरजिल्हा/जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया तात्काळ करावी,गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे संपकालीन वेतन अदा करणेबाबत,निवडश्रेणी/ चट्टोपाध्याय प्रस्ताव मार्गी लावणे बाबतच्या सूचना निर्गमित करणे,केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तातडीने घेण्यात येण्याबाबत,राज्यातील वीस पटसंख्येच्याखालील शाळा बंद करण्यात येऊ नये,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणाऱ्या समूह शाळा योजनेला कायमस्वरूपी स्थगित करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

याप्रसंगी शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय प्रसिद्धीप्रमुख संतोष बाऱ्हेवार,रावन शेरकुरे,कैलास हांडगे,विनोद चौधरी,शंकर चव्हाण,एम.एस.बिसेन,कटरे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close