ताज्या घडामोडी

हरंगुळ मधील त्या ‘बुधी’ गाईचा अखेर मृत्यू

कार्यकर्त्यांचे प्रयत्न निष्फळ

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील हरंगुळ येथे मुसळधार पावसाने अंगावर पडलेल्या गोठ्यात जखमी झालेल्या जनावरा यापैकी बुधी नावाच्या एका गाईचा रविवारी रात्री मृत्यू झाला . सखाराम बोबडे पडेगावकर याचे सह सहकाऱ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.

हरंगुळ येथे सहा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार मुसळधार पावसात बालाजी किशन कानडे यांचा गोठा रात्री अंधारात पावसामुळे पडला. यात बांधलेले पाच सहा जनावरे रात्रभर पावसात या गोठ्याखाली दबून राहिली. पाऊस व लाकडाचा मार लागून यात बूधी नावाची गाय गंभीर जखमी झाली. शेतकरी कानडे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर ही गोष्ट घालून उपचारासाठी डॉक्टर पाठवावे अशी विनंती केली. सखाराम बोबडे यांनी वडगाव येथील पशुवैद्यकीय विभागाचे डॉ पोटभरे यांच्याशी संपर्क साधून उपचारासाठी पाठवले. नायब तहसीलदार प्रमोद धोंगडे यांच्याशी संपर्क साधून गाईवरउपचार करावेत अशी विनंती केली होती. दुसऱ्या दिवशी रामेश्वर भोसले पाटील, सरपंच बीबन पठाण,मुंजाभाऊ लांडे, सतीश कानडे आदी सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गायीच्या तब्येतीची विचारपूस करत डॉक्टर कडून उपचार घडऊन आणले. पण शेवटी ते प्रयत्न निष्फळ ठरले. रविवारी रात्री बुधी या शेतकऱ्याचा आवडत्या गायीचा मृत्यू झाला. शेतकऱ्याने रडत रडत ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे यांच्या कानावर घातली. सोमवारी सकाळी डॉक्टरांनी पोस्टमार्टम व तलाठी भराड यांनी महसूल पंचनामा केल्या नंतर गाईचा विधिवत अंत्यविधी करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close