ताज्या घडामोडी

पं. स. चिमूर येथे विपणन व मार्केटिंग विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी :हेमंत बोरकर

दिनांक 7 जानेवारी 2022 ला पंचायत समिती सभागृह चिमूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह याचे द्वारे निर्मित विविध वस्तू तसेच वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वतः उत्पादित करीत असलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळावी व नवनवीन व्यवसाय निर्मिती व्हावी या उद्देशाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर यांचे द्वारे विपणन व मार्केटिंग या विषयावर पंचायत समिती सभागृह चिमूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.


महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूची योग्य प्रकारे प्याकेजिंग, ब्रँडिंग करून त्यांना ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यामुळे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उधोग योजनेअंतर्गत मंजूर झालेले व्यवसाय यांचे योग्य प्रकारे व्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने समूहातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या व्यवसायास योग्य प्रकारे बाजारपेठ मिळावी याकरिता विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
सदर कार्यशाळेला प्रवीण प्रशिक्षक श्री. मोकासे सर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस श्री. राजेश बारसागडे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक श्री. मडावी सर, श्री. ब्राह्मणे सर, कु. रजनी खोब्रागडे प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, स्वप्ना उराडे, सारिका बाहुरे, दिपाली दोडके पशु व्यवस्थापक पुंडलिक गेडाम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल, होमराज मेश्राम मत्स व्यवस्थापक श्री. पोईनकर, नितेश मेश्राम कृषी व्यवस्थापक कु. डोंगरे यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close