मा. खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते भव्य बुद्ध विहार सामाजिक भवनाचे लोकार्पण व मंजूर रस्ते बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
देसाईगंज तालुक्यातील मौजा- कोंढाळा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम व बौद्ध समाज कोंढाळा ता.देसाईगंज जि.गडचिरोली च्या वतीने सन-२०२१ -२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक भवन व बुद्धमूर्ती लोकार्पण तसेच सिमेंट काँक्रेट रोड बुद्ध विहार १० लक्ष रूपये व दलित सुधार योजनेअंतर्गत बुद्ध विहार ते राष्ट्रपाल शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड १० लक्ष रूपये या मंजूर रस्ते बांधकामाचे भूमिपूजन सोहळा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांचे शुभहस्ते दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ला फित कापून उद्घाटन सोहळा मौजा- कोंढाळा ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथे पार पडले.
याप्रसंगी खासदार नेते यांनी उद्घाटन स्थानावरुन बोलतांना म्हणाले की,या कोंढाळा गावी एक चांगली प्रतिकृती तथागत भगवान बुद्धांची मूर्ती शांतताप्रिय वातावरणात बसविण्यात आली व
व या ठिकाणी सामाजिक सभागृहाचे (सभामंडप) लोकार्पण तसेच रस्ते बांधकाम याचं माझ्या हस्ते भूमिपूजन झालं एक आनंददायी बाब आहे. याबरोबरच लहान मुले मुली यांनी या बुद्ध विहाराच्या भितींवर कुठे ही खडूनी खोडतोड न करता या सामाजिक सभागृहाचा चांगल्या तऱ्हेने नागरिक बंधू भगिनींनी लाभ घ्यावा.तथागत भगवान बुद्ध यांचे विचार व बाबासाहेबांचे संविधानिक विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
हया लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यवान जीं खोब्रागडे,लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालभाई कुकरेजा,भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, सौ.विद्या कृष्णाजी गजबे, सौ. रोशनीताई पारधी माजी महिला व बालकल्याण सभापती,आशिष पिपरे,पंढरीजी नखाते जेष्ठ भाजप नेते,वसंताजी दोनाडकर महामंत्री,प्रमोद झिलपे,रमेश अधिकारी, शंकर पारधी,ग्रामसेवक,कैलास राने, यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रसंगी विहारासाठी जागा दान करणाऱ्या मंडळी चा मा. खासदार अशोक नेते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकामाचे संचालन प्रशांत मंडपे यांही तर प्रास्ताविक राजेंद्र शेंडे व आभार बौद्ध समाज कोंढाळा अध्यक्ष नागोरावजी उके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज कोंढाळा येथील सर्व बौद्ध उपासक, उपासिका प्रयत्न केले.