भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे उद्या ब्रम्हपुरी विधानसभेच्या दौऱ्यावर

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून सुरू करण्यात आलेल्या विविध संगटनात्मक कार्यक्रमांच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रशेखरजी बावनकुळे उद्या ब्रम्हपुरी विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत.
ते विधानसभेअंतर्गत सिंदेवाही, नवरगाव, पाथरी, मेंडकी, ब्रह्मपुरी व नागभिड येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे उद्या सकाळी १० वाजता सिंदेवाही येथील बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहून सकाळी ११ वाजता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे दृकश्राव्य पद्धतीने श्रवण करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता नवरगाव येथे होणार्या एका सामाजिक मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २:३० वाजता सावली तालुक्यातील पाथरी येथे आयोजित धन्यवाद मोदीजी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०५:०० वाजता ब्रम्हपुरी विधानसभा तालुक्यातील मेंडकी येथे भाजयुमोच्या वतीने आयोजित केलेल्या युवा वारियर्स शाखेच्या उद्घाटनीय कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पुढे ब्रम्हपुरीकडे प्रस्थान करून सायंकाळी ०७:०० वाजता स्थानिक दुपारे लाॅन येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा व फ्रेंड ऑफ बीजेपी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर रात्री ०८:३० वाजता नागभिड नजिकच्या शिव टेकडीवर होणाऱ्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
करीता उद्या होणार्या या विविध कार्यक्रमांना जिल्हाभरातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर व जिल्हा संगठन महामंत्री संजय गजपुरे यांनी केले आहे.