जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे समाजसुधारक ई. पेरियर रामास्वामी नायकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली
प्रतिनिधी:राहुल गहुकर
चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 24 डिसेंबर 2023 रोजी सायं ठीक 6.30 वाजता समाजसुधारक ई. पेरियर रामास्वामी नायकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.*समाजसुधारक ई. पेरियर रामास्वामी नायकर यांच्या प्रतिमेला आयु.दुर्योधन गजभिये व आयु. पुष्पदास गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आयु.दुर्योधन गजभिये व आयु. पुष्पदास गजभिये यांनी पेरियार रामस्वामी नायकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.पेरियार इरोड वेंकट नायकर रामसस्वामी यांचा जन्म १७ सप्टेंबर १८७९ ला झाला .विज्ञान बोध आणि ते तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखविला. अशा शब्दांत मान्यवरांनी समाजसुधारक ई. पेरियर रामास्वामी नायकर, यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामजिक कार्यकर्ते प्रदीप मेश्राम यांनी केले.व आभार योगेश मेश्राम यांनी मानले.यावेळी उपासक उपसिका उपस्थित होते.