ताज्या घडामोडी

शिवजयंती निमित्ताने एन.एम.एम.एस वर आधारित केंद्रस्तरीय सराव परीक्षा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुलकळस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित एन.एम.एम.एस वर आधारित केंद्रस्तरीय सराव परीक्षेचे आयोजन जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या प्रेरणेने केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के,
उद्घाटक म्हणून सरपंच प्रतिनिधी विकसराव गव्हाळे, केंद्रीय प्राथमिक शाळा फुळकळसचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक दयानंद स्वामी, उपसरपंच प्रतिनिधी पशुपती शिराळे, ग्रामपंचयत सदस्य मन्मथ नावकीकर खडाळा शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव लिमला शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता डिग्रस्कर आदींची उपस्थिती होती.उद्घाटन सरपंच प्रतिनिधी विकासराव गव्हाळे यांनी केले.
“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निकोप स्पर्धा महत्त्वाची असते आणि एनएमएमएस सारख्या स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभही होणार आहे असे प्रतिपादन सिद्धार्थ मस्के यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले”.
स्पर्धा समन्वयक म्हणून खडाळा शाळेचे पांडुरंग मोरे, कमलापूर शाळेचे महेश जाधव, माखणी येथील सुनील शेळके तर फुलकळसचे महेश लोहकरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी केले तर आभार प्रशांत टाक यांनी मानले.
स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळसचे तानाजी कळसाईतकर अंजली रिंगने, विद्या सोळंके, प्रशांत टाक, महेश लोहकरे ,राहुल काऊतकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close