ताज्या घडामोडी

कायदेभंग करणाऱ्या वरोरा नगराध्यक्षा वर कार्यवाही करा

बसपा वरोरा तर्फे निवेदनाद्वारे मागणी.

तालुका प्रतिनिधी: ग्यानीवंत गेडाम वरोरा

देशात कोरोना महामारी चालू असताना तसेच शासनाने वेळोवेळी निर्बंध घातले असताना व दिशानिर्देश यांचे पालन करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी नियमाचे पालन करण्याकरता व महामारी आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने वरोरा शहरात अनेक व्यावसायिक आपली दुकाने उघडे ठेवून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करीत त्यांच्यावर कारवाई केली परंतु त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण करण्याचे अनुचित काम नगराध्यक्ष यांनी केले आहे.घटनास्थळी नगराध्यक्ष उपस्थित झाले तेव्हा त्यांनी मास्क परिधान केले नसल्याचे दिसून येते हे जनतेने सुद्धा पाहिले आहे ,अनेक मीडियातून या प्रकरणी बातम्या प्रकाशित झाले आहेत. या माहामारी आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी व अधिकारी जीवाची बाजी लावून काम करीत असताना त्यांना अटकाव करण्याचे कार्य सबंधित नगराध्यक्षांनी केली आहे. एखादी सामान्य नागरिक नियमाचे भंग करताना आढळल्यास व गर्दी केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येतो परंतु नगराध्यक्षांच्या विना मास्क गर्दी चे ठिकाणी असतानासुद्धा त्यांचेवर कारवाई का झाली नाही? कायदा काय सामान्य माणसासाठी आहे का? असे अनेक प्रश्न जनतेतून निघत आहेत. कायद्याचे पालन फक्त जनतेनेच करायचे आहे ?काय सत्तेत असलेल्या लोकांना कायद्याची भीती नाही काय? असे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत. तरी सर्व प्रश्नाचे निराकरण होण्याच्या दृष्टीने गांधी चौक स्थित वादग्रस्त प्रकाराची चौकशी करून सत्य बाहेर आणून प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे. व चौकशी होणे गरजेचे आहे संबंधित घटनेची तक्रार संबंधित विभागात केलेली आहे. अशा आशयाचे निवेदन तर्फे देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी एडवोकेट रोशन नावे, महेंद्र तितरे,अशोक विश्वकर्मा, महेंद्र भगत, शंकर मारके इत्यादी बसपा कार्यकर्ता उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close