ताज्या घडामोडी

“त्या ” प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करा -आयटकचे नेते रविन्द्र उमाठे यांची मागणी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वनविभाग (प्रादेशिक) शिवणी कार्यालयाचे रोखलेखा खर्च प्रमाणकेची तातडीने विशेष पथकाद्वारे चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा आयटकचे जेष्ठ नेते अधिवक्ता रविन्द्र उमाठे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी केली आहे.दरम्यान या संदर्भात सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी दि.१०-१-२०२४ला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली होती.याच तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.२९जानेवारी २०२४ला उपरोक्त प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी असे पत्र मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांना पाठविण्यात आले आहे.पण अद्याप या प्रकरणात निःपक्षपाती चौकशी झाली नसल्याचे समर्थ यांचे म्हणणे आहे. उपरोक्त प्रकरणी तातडीने चौकशी न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा आयटकचे रविन्द्र उमाठे यांनी दिला आहे.समर्थ यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे या पूर्वीच एक लेखी निवेदन सादर केले आहेत.सदरहु प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समर्थ यांनी म्हटले आहे.या अगोदर याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली होती हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close