पालकमंञी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली ना.अतुल सावे यांच्या कडे घरकुल निधी मंजूर करण्याची मागणी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतंर्गत व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतंर्गत गरजू लोकांना घरकुल मिळावे यासाठी सन 2022-23 व सन 2023-24 या वित्तीय वर्षामध्ये आकांक्षीत जिवती व सावली तालुक्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत योजनेतून 1024 घरकुल व पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतून आकांक्षीत जिवती तालुक्यातील एकूण 148 घरकुलांना जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिली आहे .

सदरहु प्रस्ताव संबंधित मंञालयाचे विभागात सादर केले असून, दोन्ही योजनेतून जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिलेल्या घरकुल लाभार्थ्यांना निधी मंजूर व्हावा यासाठी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विभागाचे मंञी ना.अतुल सावे यांचेकडे मागणी केली असता, सदर घरकुलांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शिफारशीने लवकर निधी मंजूर होणार असल्याचे जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजयुमोचे जिल्हा महामंञी महेश देवकते यांनी सांगितले.