तालुकास्तरीय पोषण परसबाग व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती

प्रतिनिधी :हेमंत बोरकर
दिनांक 17 डिसेंबर 2021 ला मौजा टेकेपार तालुका चिमूर येथे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत तालुकास्तरीय पोषण परसबाग व सेंद्रिय निविष्ठा श्री. ईश्वर दोडके यांचे शेतात तयार करण्यात आली.

चिमूर तालुक्यात टेकेपार येथे नागरिकांना अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तालुकास्तरीय पोषण परसबागेची निर्मिती सोबतच सेंद्रिय निविष्ठा यामध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, वेस्ट डी कंपोजर, घनजीवामृत, निमस्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मस्त्र, गांडुळ खत, बिजामृत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कोविड परिस्थितीत ताजा भाजीपाल्याचा तुटवडा दूर करणे व जोखीम प्रवण व्यक्ती व कुटुंबाच्या अन्नसुरक्षेचा आणि पोषण सुरक्षेच्या प्रश्न निकाली निघण्यास यामुळे मदत होणार असून कुपोषणमुक्तीसाठी हातभार लागणार आहे. सदर पोषण परसबाग मध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला,फळभाज्या, औषधी वनस्पती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक श्री. राजेश बरसागडे यांनी दिली आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पोषण आहाराचा प्रश्न बिकट झाला आहे. रासायनिक खताच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो. त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात त्यावर पर्याय शोधून ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आहारामध्ये पोषकद्रव्ये मिळावी व कमी खर्चामध्ये पोषक सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्या गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेदच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व पशुसखी, कृषिसखी यांचे मार्फत तालुकास्तरीय पोषण परसबाग व सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी श्री. सुधीर ठेंगरी CC org., मा. ईश्वर दोडके टेकेपार, मा. मेघदिप ब्राह्मणे, रजनी खोब्रागडे तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर,ईश्वर मेश्राम, स्वप्ना उराडे, सारिका बाहुरे, दिपाली दोडके, पशु व्यवस्थापक पुंडलिक गेडाम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल, होमराज मेश्राम मत्स व्यवस्थापक श्री. पोईनकर, नितेश मेश्राम कृषी व्यवस्थापक कु. डोंगरे व तालुक्यातील सर्व कृषीसखी, पशुसखी कृतीसंगम सखी उपस्थित होते.