ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासन, वन विभाग,नागपूर तर्फे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ,कऱ्हांडला, सभागृह येथे संपन्न


मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

महाराष्ट्र शासन, वन विभाग,नागपूर तर्फे दिनांक – १० नोव्हेंबर २०२० रोजी, वन विभागाच्या कऱ्हांडला, सभागृह येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन, वन विभाग,नागपूर तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी फिरत दवाखाना पथक द्वारे उमरेड कऱ्हांडला अभयारण्य व बोर व्याघ्र प्रकल्पा लगत दुर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवत आहे.
पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्टान, ह्यांच्या सहकार्याने आणि उर्वी अशोक पीरामल फाउन्डेशन च्या सौजन्याने राबविण्यात येणाऱ्या फिरता दवाखाना पथकच्या आरोग्य सुविधेचा लाभ उमरेड कऱ्हांडला अभ्यारण व बोर व्याघ्र प्रकल्प लगत दुर्गम भागात वसलेल्या गावांमधील सुमारे ६०,७०५ लोकांना होत आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या अशा काळातदेखील फिरता दवाखाना पथक नियमितपणे गावोगावी जाऊन प्राथमिक तपासणी करून औषधपचार करत होते तसेच कोरोना संसर्ग विषयक जनजागृती करत होते.
सदर कार्यक्रमास सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी चे श्री गोपाळ ठोसर, मानद वन्यजीव तज्ञ, डॉ. अनिल पिंपळापुरे, वन विभागाचे श्री राहुल गवई, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य व श्री. अजित साजणे सहाय्यक वनसंरक्षक सेलू घटक पेंच व्याघ्र प्रकल्प हे मान्यवर उपस्थित होते व इतर वन अधिकारी हजर होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या उल्लेखनीय वैद्यकीय कार्याची स्तुती करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे – प्रोजेक्ट कॉर्डीनेटर, प्रशांत कांबळे.
वैद्यकीय अधिकारी – डॉ. परवीर त्रिपाठी, डॉ. नंदकिशोर मंदाडे, डॉ. नाहुष बावनकर, डॉ .राकेश सोनकुसरे,
नर्स – स्विटी चौधरी, सुकेशनी राऊत, सारिका भोयर, किरण इरपते.
सहकारी कर्मचारी – राजेश लुटे, सतीश पारधी, जितेंद्र कोहळे, निखिल नागदेवते.
वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि उर्वी अशोक पीरामल फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अशा प्रकारचे एकूण २ फिरते दवाखाने ४ वर्षा पासून पेंच व्याघ्र प्रकल्पात, व १ वर्षा पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ह्या भागातील दुर्गम गावांमध्ये देखील हा उपक्रम सुरु होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close