ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश उत्सव तर्फे विविध स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन
तालुका प्रतिनिधीःसनम रा. टेंभुर्णे ब्रम्हपूरी
ब्रम्हपुरी ,सिंदेवाही, सावली विधानसभेचे आमदार व महाराष्ट्र विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवर यांच्या संकल्पनेतून महाराजा गणेश उत्सव ब्रम्हपुरी येथे भव्य श्रीराम मंदिर अयोध्या प्रतिकृती आणी मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या माध्यमातून विविध स्पर्धा व मनोरंजन संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
दि. १७/०९/२०२४ रोजी इंडियन आयडॉल फेम सलमान अली व सा रे ग म पा फेम इशिता विश्वकर्मा येणार आहेत. व दि. १५/०९/२४ रोजी हाऊजी खेळ ( तांबोला गेम) चे आयोजन करण्यात आले होते. भरपूर सख्येने लोकांनी सहभाग घेतले. त्यात प्रथम पारितोषिक रिफ्रिजरेटर, द्वितीय पारितोषिक वॉशिंग मशीन , तृतीय पारितोषिक LED TV आणी प्रत्येक लाईन वर मिक्सर तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध गिफ्ट चे वाटप मा. शिवानीताई वडेट्टीवर सरचिटणीस महाराष्ट्र युथ काँग्रेस, मा. विलासभाऊ विखार नगर परिषद ब्रम्हपुरी माजी सभापती बांधकाम विभाग, मा. खेमराजजी तिडके व सोनूभाऊ नाकतोडे सरपंच उदापूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमच अश्या प्रकारचे आयोजन ब्रम्हपुरी येथे करण्यात आले असून मोठ्या संख्येने शहरवासीय आनंदाने व उत्साहाने येत आहेत.