नेरी येथे पोलीस स्टेशन चिमुरच्या वतीने वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
दिनांक 15/12/2021 रोजी सकाळी 11/00 वा. पोलीस स्टेशन चिमुरच्या वतीने मौजा नेरी येथे जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नेरी येथील विद्यार्थी/विद्यार्थींनी यांचे सहकार्यातुन बाजार चौक नेरी, P.H.C. चौक येथून प्रभात फेरी काढुण वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये एकुण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याकरिता विद्यार्थ्यांनी घोषना देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या रस्ते अपघातांवर प्रतिबंध व्हावा या उद्देशाने पोलीस निरीक्षक मनोज गभने पो.स्टे. चिमुर यांचे संकल्पनेतुन शाळकरी मुलांच्या माध्यमातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन सदर रॅलीकरीता जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नेरी चेमुख्याध्यापक श्री. एस. एन. येरणे, श्री. वर्धलवार सर, श्री. एम. एम. पिसे, श्री. चाचरकर सर, श्री. मेश्राम सर, सौ. जे. एन. पिसे हजर होते.
सदरची रॅली पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस अंमलदार भारत पुसांडे, प्रमोद पढाल, प्रमोद गुट्टे यांचे सहभागाने आयोजित करण्यात आली..