ताज्या घडामोडी

कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचे कडे

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पांडुरंग पचारे हे दि.31-3-2023ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांना कोरपनाचे तहसिलदार महेन्द्र वाकलेकर यांनी दि. 31मार्चला मध्यान्हानंतर शासन सेवेतून भारमुक्त केले.त्या मंडळाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचेकडे सोपविण्यात आला आहे.चव्हाण हे गेल्या चार वर्षांपासून गडचांदूर महसूल मंडळाचा कार्यभार सांभाळत आहे.तर सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पचारे यांनी 36वर्ष 11महिणे 3दिवस महसूल विभागात पटवारी ते मंडळ अधिकारी म्हणून काम केले होते.आपल्या सेवेच्या कार्यकाळात त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यां सोबत जनतेचा देखिल विश्वास संपादन केला होता.सेवेच्या कालावधीतच त्यांनी कला क्षेत्रात देखिल आपली छाप सोडली होती.ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कोल्हापूरचे सभासद आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close