कोटा कोचिंग क्लासेस मध्ये पूर्ण महाराष्ट्रातून मोफत प्रवेश घेण्यासाठी सुवर्णसंधी-प्रा.झरीन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी जिल्हा परभणी मध्ये कोटा कोचिंग क्लासेस यावर्षी प्रवेश घेणाऱ्यांसाठी मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी प्राप्त करून देत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून नीट/ एमएच-सीईटी वैद्यकीय शाखे च्या अभ्यासक्रम पूर्वतयारीसाठी 25 विद्यार्थी तसेच जेईई इंजीनियरिंगच्या अभ्यासक्रम पूर्वतयारीसाठी 25 विद्यार्थी असे एकूण 50 गुणवंत विद्यार्थ्यांना कोटा कोचिंग क्लासेस मध्ये मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यात आलेली आहे तरी त्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना असे आव्हान करण्यात येते की, या सुवर्णसंधीचा त्यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन प्रा झरीन यांनी केले आहे.
पाथरी तील सदरील कोचिंग क्लासेस मध्ये कोटा येथील अनुभवी शिक्षक आपल्या पाल्यांना कोचिंग ची मोफत सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे. बाहेर गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी स्वतंत्र अत्यल्प फी मध्ये वसतिगृह सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवंत 50 विद्यार्थी टॅलेंट हंट स्क्रीनिंग टेस्ट द्वारा निवड केले जाणार आहेत सदरची स्क्रीनिंग टेस्ट दिनांक 9 एप्रिल 2023 रविवार रोजी दुपारी 12:00 वाजता पाथरी शहरात ऑफलाइन पद्धतीने मराठी , इंग्लिश व उर्दू अशा सर्व माध्यमातून CBSE व स्टेट बोर्ड साठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका अशा स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना असे आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी सदरील परीक्षेत बसून आपली गुणवत्ता सिद्ध करावी, NEET /JEE च्या प्रत्येकी प्रथम पंचवीस येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष मोफत कोचिंग क्लासेसचे मार्गदर्शन केले जाणार आहे. गरीब व गुणवंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील कोटा येथील शिक्षण प्रणालीचा लाभ घेता यावा व आपल्या भागातील ग्रामीण विद्यार्थी मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यास सक्षम व्हावे या उद्देशाने पाथरी शहरात कोटा येथील नामांकित शैक्षणिक कंपनीने डॉ सलीम अमीन शेख व न्यू आनंदवन इंटरनॅशनल स्कूल पाथरी च्या माध्यमातून सदरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी माहिती कोटा कोचिंग क्लासेस च्या प्रमुख व्यवस्थापिका श्रीमती झरीन मॅडम यांनी सांगितले.
टॅलेंट हंट स्क्रीनिंग टेस्ट ची नाव नोंदणी सुरू झाली आहे त्या साठी विद्यार्थ्यांनी 8983507120 या फोन क्रमांक वर सम्पर्क साधून ऑनलाईन google फॉर्म भरून करावयाची आहे असे आवाहन कोचिंग क्लासेस च्या प्रवेश प्रमुख श्रीमती योगिता पैठणे मॅडम यांनी केले आहे. सदरील माहिती सर्व गरीब गरजू गुणवंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्या पर्यंत पोहचविण्यासाठी श्री हनुमान वावधने, श्रीमती मंगल सुरवसे . श्रीमती शीला खांडके, श्री मोमीन सर तसेच स्थानिक व्यवस्थापक श्री विठल सोगे अहोरात्र परिश्रम करत आहेत.