ताज्या घडामोडी

बेपत्ता मुलाचे मृतदेह मिळाल्याने बापाचे सखोल चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

तेढा, गोरेगाव:
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हलबिटोला (तेढा) चे रहिवाशी इंदर काशीराम भोयर यांचा मुलगा दिपक इंदर भोयर वय २५ वर्ष ०४ सप्टेंबर २०२१ ला घरून बेपत्ता झाला होता. ती तक्रार पोलिस स्टेशन गोरेगाव ला दिली होती. पण दि. ०६ सप्टेंबर २०२१ ला सकाळी ०७ वाजता दिपक चे मृतदेह तलावामध्ये मिळाले. गोरेगाव पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता प्राथमिक अहवाल नोंदणी करून कारवाही केली. परंतु मृताचे वडील इंदर हे पोलिसांच्या कार्यवाही पासून असंतुष्ट आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, गोरेगाव पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केली नाही. माझ्या मुलाने आत्महत्या केली?, की त्याला कोणी मारून फेकले?, हे कळत नाही आहे. माझ्या मुलाला घरून कोणी बोलावून नेले?, तसेच कोण कोण माझ्या मुलासोबत होते?, असे इंदर यांचे प्रश्न आहेत. या सर्वांची चौकशी गोरेगाव पोलिसांनी केली नाही म्हणून या सर्व प्रकरणाची व सामील सर्वांची सखोल चौकशी व्हावी अशी इंदर यांची याचना आहे.
करिता, यासाठी चे पत्र इंदर यांनी पोलीस अधीक्षक जिल्हा गोंदिया, काँग्रेस कमिटी जिल्हा गोंदिया, तहसील कार्यालय गोरेगाव, तिरोडा/गोरेगाव विधानसभा अध्यक्ष, तसेच सोशल मीडिया काँग्रेस कमिटी व सर्व पत्रकार बंधू यांना दिले आहे.
सदर प्रकरणात काय काय खुलासे समोर येतील, पोलीस योग्य चौकशी करून खरं काय ते जनतेसमोर आणतील का.. याकडे सर्व गाववासीयांचे लक्ष लागून आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close