मचारना येथील विविध सेवा सहकारी संस्थेची निवडणूक अविरोध!
इतर संस्थांना आदर्श निवडनुक करन्यात आली
प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
संस्थेच्या खर्चाची बचत
लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील मचारना येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक अविरोध पार पडली. यात अध्यक्षपदी भेनाथ झलके तर उपाध्यक्षपदी नित्यानंद ठवकर यांची वर्णी लागली. बिनविरोध सर्वांच्या सहमतीने संचालक मंडळाची निवड झाल्याने संस्थेच्या खर्चाची बचत होऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीला सहकार्य मिळाले.
संचालकपदी संतोष कुथे, डोमाजी लांजेवार, थालीराम लुटे, रामू बाभरे, विलास शेंडे, नामदेव लांजेवार, धनराज गोस्वामी, माधव भोयर, जयराम शेंडे, सिंधुबाई कातोरे, गिताबाई घोनमोडे असे एकूण १३ संचालकांची अविरोध निवड पार पडली.
याकरिता गावच्या सरपंच संगीता घोनमोडे, भास्कर बांते, प्रदीप ठवकर, मिताराम शेंडे, प्रमोद सेलोकर, पोलीस पाटील लोमेश वर कातोरे, दसरथ कुथे, संजय फटे ,पराग ढवकर, पवन शेंडे, श्यामलाल किन्नाके, शरद मेश्राम, तथा शेतकरी वर्ग व गावकऱ्यांनी सहर्ष सहकार्य केले.
शेतकरी आधीच कर्जात शेती कसतो आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या संस्थेत बचत महत्त्वाचा विषय आहे. काळाची पावले ओळखत लोकशाही मार्गाने मात्र सर्वांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक निश्चितच शेतकरी हितार्थ प्रसंशनीय आहे.