अपूर्ण बांधकामामुळे जीवघेणा झालेला रस्ता पूर्ण करण्याची नवेगाव ब्राम्हण येथील गावकऱ्यांची मागणी
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नवेगाव ब्राम्हण ते भिसी हा १.६ कि. मी. च्या रस्त्याचे बांधकाम १२ जून २०१९ रोजी सुरू करण्यात आले जे १ जून २०२० पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु अध्यापही ते अपूर्णच आहे. ५० ते ६० मीटर पर्यंत रस्त्यावर गिट्टी सुद्धा पसरवण्यात आलेली आहे. पूर्ण रस्ताच गिट्टी आणि मातीचा असून पूर्ण रस्ताच खराब आहे. पावसाळ्यात तर रस्त्याची खूपच दयनीय अवस्था होते. गावकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा रोज या रस्त्याने जीव मुठीत घेऊन पायदळ येणे जाणे करावे लागते.
म्हणून कोणतीही अनुचित घटना घडणेआगोदर ह्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होने गरजेचे आहे अशी गावकऱ्यांची कळकळीची मागणी आहे. रस्ता पूर्ण झाल्यास लोकांच्या पायपीटीचा त्रास तसेच अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी होईल. करिता मा. कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना चंद्रपूर यांचेकडे गावकऱ्यांतर्फे अर्ज देऊन रस्ता पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. गावकऱ्यांतर्फे सामाजिक कार्यकर्ता- कमलाकर बोरकर, संदीप खंडाळ, बाबा पाटील, कमलाकर पाटील आणि ग्रा. पं. गडपीपरी सदस्य सुधाकर वाकडे यांनी दि. २९/०९/२०२१ ला प्रशासनास निवेदन दिले.