काजळसर येथे जागतीक महिला दिन साजरा
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
उमेद अभियाना अंतर्गत संजिवनी ग्राम संघ काजळसर च्या वतीने जागतिक महिला दिन नुकताच मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनी मेश्राम ह्या होत्या.तर प्रमुख अतिथी आशिष नन्नावरे (सरपंच ग्रा.पं.काजळसर),मंदाताई चौधरी (से.नि.अंगणवाडी सेविका),सत्वशिला खोब्रागडे (ग्रा.पं.सदस्या), देवांगना मेश्राम लता निखारे,रिना पाटील,नेहा सामुसाकडे (ग्रा.पं.सदस्या),स्वप्नहिरा रामटेके,सोनवाने,हटवादे,कावळे,वाटगुरे,नेवारे हे होते.सुरवातीला महापुरूषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आणी सत्कार ललीता दुबे (से.नि.मदतनीस) काजळसर व मंदाताई चौधरी (से. नि. अंगणवाडी सेविका) काजळसर यांचा शाल,साडी देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सिटिसी गितांजली मेश्राम, सिआरपी धनश्री नाकाडे यानी केले.कार्यक्रमाचा लेखाजोगा व उमेद अभियानाचा उद्देश,करतव्य,बचत,भरारी,उभारी वनशोभा खोब्रागडे यानी प्रतिपादित केले.आभार मिनाक्षी हटवादे यानी केले. सायंकाळी महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला उद्घाटन आशिष नन्नावरे सरपंच ग्रा पं काजळसर यांनी केले तर प्रमुख अतिथी एड.मिलिंद मेश्राम, निकेश रामटेके,भगवान खामदेवे प्रमोद सामुसाकडे,लालाजी मेश्राम,देवानंद कावडे,सुभाष नेवारे सरपंच ग्रा.पं मोठेगांव,इंगुलकर ग्रा.पं.मोठेगांव यांचे हस्ते पार पडले. त्यात लाडली लेक,कुटंब व्यवस्था,महिला बचत गटावर नाटिका,गीत,नृत्य घेण्यात आले.संचालन गितांजली मेश्राम व धनश्री नाकाडे यानी तर आभार वनशोभा खोब्रागडे यानी केले.कार्यक्रमाला गावातील बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थिति होत्या.